शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

शिवडाव येथील शाळकरी मुलाला जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:20 IST

कोल्हापूर : शिवडाव (ता. भुदरगड) येथील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अ‍ॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करून किडनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नीलेश अनिल जाधव (वय १६) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या किडनीचे काम पूर्ववत सुरू झाले असून, तो पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू ...

कोल्हापूर : शिवडाव (ता. भुदरगड) येथील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अ‍ॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करून किडनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नीलेश अनिल जाधव (वय १६) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या किडनीचे काम पूर्ववत सुरू झाले असून, तो पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. रामानंद म्हणाले, शिवडाव येथे दुचाकी अपघातात नीलेश जाधव २२ नोव्हेंबर २०१७ रोजी जखमी झाला. यात त्याच्या पोटाला मार बसून उजव्या किडनीला मोठी दुखापत होऊन रक्तस्राव झाला. त्याचा रक्तदाबही कमी झाला होता. सोनोग्राफी केली असता किडनीभोवती रक्त जमा झाले होते. त्यामुळे त्याला प्रथम कडगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी नेण्यात आले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला तत्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून ‘सीपीआर’मध्ये आणले. सुमारे चार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यासाठी रक्ताच्या चार बाटल्या लागल्या. ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. मोठ्या प्रमाणात रक्त गोठून राहिल्याने पोटाचा आकार व क्षमता कमी झाली होती. शस्त्रक्रियेनंतर पोट टाके घालून बंद करणे शक्य नव्हते; म्हणून ‘अ‍ॅब-थेरा’ (पोट बंद न करता) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एका कृत्रिम आवरणाने झाकण्यात आले. तसेच छातीमध्ये नळी टाकून साठलेले रक्त काढले.शस्त्रक्रियेनंतर त्याला तीन दिवस जीवरक्षक प्रणालीवर ठेवले. यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करून कृत्रिम आवरण काढून टाकून पोट पूर्णपणे बंद केले. दोन दिवसांनंतर श्वसनाची नळी व १४ व्या दिवशी छातीची नळी काढली व त्याचे खाणे सुरू झाले आणि तो चालू-फिरू लागला. ४० दिवसांनंतर त्याला डिस्चार्जदेण्यात आला. शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कौस्तुभ मेंच, डॉ. मधुर जोशी, डॉ. नीता भुरट यांनी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. दीपाली, डॉ. राहुल पाटील, डॉ. राऊत यांचे सहकार्य मिळाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, अभ्यागत समितीचे सदस्य सुनील करंबे उपस्थित होते.नीलेशसाठी डॉक्टर देवदूतचनीलेशचे मामा उत्तम भिकाजी यादव म्हणाले, नीलेशची आई शेतकाम, वडील गवंडीकाम करतात. तो तांबाळे हायस्कूल येथे नववीत शिकत आहे. किडनीवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने सीपीआर येथील डॉक्टर नीलेशसाठी देवदूतच ठरले आहेत.